Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

PM Kisan 20th Installment : 20 जूनला ₹2000 येणार म्हणाले होते, आता कधी येणार? PM किसान अपडेट वाचा

PM Kisan 20th Installment PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता 20 जून 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा होती. मात्र, अनेक शेतकरी अजूनही म्हणतात की त्यांचा हप्ता जमा झालेला नाही. यामागील प्रमुख कारण म्हणजे केंद्र सरकारने घेतलेली कडक नियमावली – e-KYC पूर्ण नसेल किंवा जमीन पडताळणी प्रक्रिया पूर्ण नसेल तर पैसे अडकणारच!

PM Kisan 20th Installment
PM Kisan 20th Installment

PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २०वा हप्ता २० जून २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचे पैसे अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत.

शेतकरी संभ्रमात आहेत की, “पात्र असूनही हप्ता का अडकतो आहे?” यामागे काही महत्वाची कारणे आहेत, जी सरकारने स्पष्ट केली आहेत. चला पाहूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पैसे का अडले:

PM किसान योजनेचा 20 वा हप्ता खात्यात का आला नाही? जाणून घ्या कारणे!

1. e-KYC नसेल तर मिळणार नाही हप्ता

केंद्र सरकारने PM Kisan 20th Installment आधीच स्पष्ट केलं आहे की PM किसान योजनेचा कोणताही हप्ता मिळण्यासाठी आधार आधारित e-KYC अनिवार्य आहे. e-KYC न झाल्यास लाभार्थ्याचं नाव लाभार्थी यादीतून वगळलं जाऊ शकतं.

काय कराल?
तुमचं e-KYC स्टेटस जाणून घेण्यासाठी https://pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Know your status’ पर्याय वापरा आणि e-KYC पूर्ण करा.

2. जमिनीची पडताळणी न झाल्यासही होऊ शकतो अडथळा

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या जमिनीचा डेटा अपलोड होणं आणि सत्यापन होणं गरजेचं आहे. अनेक जिल्ह्यांत ही प्रक्रिया अजूनही अपूर्ण आहे. अशावेळी पात्र असूनही हप्ता अडू शकतो.

काय कराल?
स्थानिक तलाठी कार्यालयात किंवा कृषी विभागात संपर्क साधून तुमच्या नावाची जमिनीची नोंद व पडताळणी झाली आहे का, हे तपासा.

3. बँक खात्याशी आधार लिंक नसेल

काही वेळा बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसेल, तर देखील रक्कम खात्यात येत नाही.

काय कराल?
बँकेमध्ये जाऊन तुमचं खाते आधारशी लिंक आहे का हे तपासा आणि लिंक नसेल तर तातडीने प्रक्रिया पूर्ण करा.

शेवटी काय लक्षात घ्याल?

PM Kisan 20th Installment PM किसान योजनेचा हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी खालील बाबी तात्काळ पूर्ण करा:

  • e-KYC ✅
  • जमिनीची पडताळणी ✅
  • खाते आणि आधार लिंक ✅

जर हे सर्व योग्य पद्धतीने पूर्ण असेल, तरीही हप्ता न आला असेल तर आपण pmkisan.gov.in वर तक्रार नोंदवू शकता किंवा आपल्या स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करा.


महत्त्वाची टीप: हप्ता मिळवण्यासाठी कोणत्याही दलालाच्या भूलथापांना बळी पडू नका. ही योजना थेट सरकारमार्फत शेतकऱ्यांना दिली जाते.

Related