पीक विमा योजना खरीप 2025: अर्ज सुरू, पात्रता, विमा रक्कम व सर्व माहिती
पीक विमा योजना खरीप 2025 सुरू होण्याची तारीख:

१ जुलै २०२५ पासून खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) लागू झाली आहे. शेतकरी बांधवांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त असून, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळते.
पीक विमा योजना खरीप महत्वाच्या तारखा:
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 01 जुलै 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 जुलै 2025
- हंगाम: खरीप हंगाम 2025
पीक विमा योजना खरीप पात्रता (Patrata):
- अर्जदार हा भारतातील नोंदणीकृत शेतकरी असावा.
- शेतजमिन स्वतःची किंवा भाडेकराराची असावी.
- संबंधित हंगामात पिक पेरणी केलेली असावी.
- शासकीय पोर्टलवर किंवा नजिकच्या CSC केंद्रावर नोंदणी अनिवार्य आहे.
पीक विमा योजना खरीप आवश्यक कागदपत्रे (Document):
- आधार कार्ड
- 7/12 उतारा (मालकी हक्काचे पुरावे)
- बँक पासबुक (IFSC कोडसह)
- मोबाईल नंबर
- शेती करार पत्र (जर जमीन भाड्याने घेतली असेल तर)
विमा हप्ता किती? (Vima Bharana Pese):
विमा रक्कम (रु.) | 2% हप्ता (शेतकरी भरायचा) | विमा मिळणारी रक्कम (नुकसान झाल्यास) |
---|---|---|
₹30,000 | ₹600 | ₹30,000 पर्यंत (पूर्ण विमा संरक्षण) |
₹40,000 | ₹800 | ₹40,000 पर्यंत |
₹50,000 | ₹1000 | ₹50,000 पर्यंत |
पीक विमा योजना खरीप अर्ज कुठे भरावा? (Kute Bharava):
- ऑनलाइन पोर्टल: https://pmfby.gov.in
- CSC (Common Service Center) नजिकच्या ग्रामपंचायतीमध्ये
- सहकारी संस्था, बँका व कृषी कार्यालयामार्फतही अर्ज स्वीकारले जातील.
पीक विमा योजना खरीप अर्ज कधी भरावा? (Kadhi Pasun Suru?)
- खरीप हंगामासाठी अर्ज प्रक्रिया १ जुलै २०२५ पासून सुरू झाली आहे.
- शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे.
- शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकर अर्ज भरावा, अन्यथा पोर्टल तांत्रिक अडचणींमुळे बंद होऊ शकते.
पीक विमा योजना खरीप योजना फायदे:
- अतिवृष्टी, पावसाअभावी पिकांचे नुकसान भरून काढणे
- नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झाल्यास सरकारी भरपाई मिळते
- आर्थिक स्थैर्य व सुरक्षिततेची हमी
पीक विमा योजना खरीप अधिक माहिती कुठे मिळेल?
- जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय
- नजिकचे CSC केंद्र
- अधिकृत संकेतस्थळ: https://pmfby.gov.in
टीप: शेतकरी बंधूंनो, पिक विमा योजना तुमच्या पिकांना नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवते. त्यामुळे वेळेवर अर्ज करा आणि आर्थिक सुरक्षितता मिळवा
#PMFBY2025 #पीकविमा #Kharif2025 #ShetkariYojana #पीकविमायोजना #कृषीयोजना

I’m Akshay Sakrate, a blogger with 3+ years of experience covering government schemes, women empowerment, and rural development. I aim to provide clear and reliable information to help people access the benefits they deserve. I simplify complex schemes into easy-to-follow guides, making government services more accessible to all.