Ladki Bhahin Yojana 13 installment : महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू केलेली ‘माझी लाडकी बहीण’ योजना सध्या खूपच उपयुक्त ठरत आहे. या योजनेअंतर्गत दरमहा ₹1500 थेट बँक खात्यात जमा होतात.

महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा, औषधोपचार, घरखर्च आणि इतर गरजांसाठी या रकमेचा उपयोग करता येतो.
ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठा आधार
या योजनेमुळे विशेषतः गावाकडच्या महिलांना मोठा आर्थिक आधार मिळतोय. घर चालवताना महिला आर्थिकदृष्ट्या निर्णय घेऊ लागल्या आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि समाजातला मान वाढतो आहे.
१३वा हप्ता कधी जमा होणार?
जुलै २०२५ महिन्यातील १३वा हप्ता २४ जुलै रोजी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची शक्यता आहे. काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे हा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उशिरा जमा होऊ शकतो.
२ कोटी ४७ लाख महिलांची नोंदणी
या योजनेसाठी सध्या २ कोटी ४७ लाख महिलांनी नोंदणी केली आहे. त्यातील पात्र महिलांना ही रक्कम मिळणार आहे. पण काही महिलांना चुकीची कागदपत्रं, बँक खाते निष्क्रिय असणे, किंवा इतर कारणांमुळे हा लाभ मिळू शकत नाही. त्यामुळे अर्ज तपासून घेणं खूप गरजेचं आहे.
लाडकी बहिन योजनेचा डबल हप्ता! 11वा आणि 12वा मिळणार एकत्र ₹3000
जर एखाद्या महिलेला 11वा हप्ता मिळालेला नसेल, तर चिंता करण्याची गरज नाही. सरकारने जाहीर केले आहे की अशा महिलांना 11वा आणि 12वा हप्ता एकत्र म्हणजेच ₹3000 ची रक्कम खात्यात पाठवण्यात येईल. यामुळे अनेक महिलांना एकाचवेळी दोन हप्त्यांचा लाभ मिळणार आहे.
या अटी पूर्ण करणे आवश्यक
- महिला महाराष्ट्रची रहिवासी असावी
- वय १८ ते ६५ वर्षांदरम्यान असावं
- वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावं
- महिला आयकर भरत नसावी
- बँक खाते आधार कार्डशी जोडलेलं असावं
- बँक खाते DBT साठी सक्रिय असावं
जर या अटी पूर्ण नसतील तर लाभ मिळणार नाही.
मागील हप्त्यांची थकबाकी मिळणार का?
होय! सरकार काही वेळा मागील महिन्याचे हप्ते देखील पुढच्या हप्त्यासोबत एकत्र जमा करते. त्यामुळे काही महिलांना एकावेळी ₹3000 किंवा ₹4500 देखील मिळू शकतात.
नाव यादीत आहे का? अशी करा तपासणी
- ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा नगरपरिषद संकेतस्थळावर तपासणी करता येते
- ‘नारीशक्ती’ मोबाईल अॅप मधून नाव पाहता येते
- CSC सेंटर वर जाऊन देखील तपासता येते
यादीत नाव नसल्यास लाभ मिळणार नाही.
अर्जात चूक झाली आहे का?
बऱ्याच महिलांचे मोबाईल नंबर चुकीचे, पत्ता अपूर्ण, किंवा आधार लिंक नसलेले बँक खाते असल्याने पैसे येत नाहीत. त्यामुळे अर्ज पुन्हा तपासा आणि आवश्यक बदल करून घ्या.
सध्या नवीन अर्ज घेतले जात नाहीत
सरकारने २०२४ पासून नवीन अर्ज प्रक्रिया थांबवली आहे. सध्या फक्त पूर्वी अर्ज केलेल्या आणि मंजूर झालेल्या महिलांना पैसे मिळत आहेत. नवीन अर्ज सुरु झाल्यास त्याची माहिती अधिकृत संकेतस्थळ किंवा नारीशक्ती अॅप वर दिली जाईल.
महत्वाच्या सूचना – हे लक्षात ठेवा
- बँक खाते सक्रिय ठेवा
- आधार व मोबाईल माहिती अपडेट ठेवा
- फक्त सरकारी संकेतस्थळांवरच विश्वास ठेवा
- कोणत्याही अडचणीसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा
YouTube चॅनेल सबस्क्राइब करून ग्रुपमध्ये सामील व्हा
🔹 पायरी 1:
“Subscribe Now” बटणावर क्लिक करा आणि आमचा YouTube चॅनेल सबस्क्राइब करा.
🔹 पायरी 2:
YouTube चॅनेल नवीन टॅबमध्ये उघडेल.
तिथे सबस्क्राइब बटणावर क्लिक करा.
🔹 पायरी 3:
सबस्क्राइब केल्यावर पुन्हा वेबसाइटच्या पेजवर या (जे पेज पूर्वी होतं).
🔹 पायरी 4:
आता तुम्हाला तिथे “Join WhatsApp Group” अशी लिंक दिसेल.
त्या लिंकवर क्लिक करा.
🔹 पायरी 5:
WhatsApp ओपन होईल, आणि तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये जॉइन रीक्वेस्ट पाठवू शकता.
🔹 पायरी 6:
तुमची रीक्वेस्ट स्वीकारली जाईल, आणि तुम्ही ग्रुपचा भाग व्हाल.
आधी आपल्या YouTube चैनल ला Subscribe करा आणि परत याच्या खाली तुम्हाला लिंक दिसेल

I’m Akshay Sakrate, a blogger with 3+ years of experience covering government schemes, women empowerment, and rural development. I aim to provide clear and reliable information to help people access the benefits they deserve. I simplify complex schemes into easy-to-follow guides, making government services more accessible to all.