Crop Insurance List Maharashtra : ११ ऑगस्ट २०२५ रोजी, केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट विम्याची रक्कम जमा केली आहे. राजस्थानमधील झुंझुनू येथे आयोजित कार्यक्रमात, केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत हा निधी वितरित करण्यात आला.

राज्यानुसार मिळालेली रक्कम पहा
या जाहीर पहिल्या टप्प्यात देशभरातील ३० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना ₹३,९०० कोटींहून अधिक पीक विम्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात (DBT) जमा करण्यात आली. या वाटपात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे.
- : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ₹९२१ कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
- मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना सर्वाधिक, ₹१,१५६ कोटी मिळाले.
- राजस्थान: राजस्थानमधील ७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ₹१,१०० कोटी मिळाले.
- छत्तीसगड: छत्तीसगडमधील शेतकऱ्यांना ₹१५० कोटी मिळाले.
- इतर राज्ये: उर्वरित राज्यांतील शेतकऱ्यांना ₹७७३ कोटी वितरित करण्यात आले.
पंतप्रधान पीकविमा 2024 योजनेची आकडेवारी
२०१६ पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत ७८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या अर्जांना मंजुरी मिळाली आहे. शेतकऱ्यांनी प्रीमियम म्हणून फक्त ₹३५,८६४ कोटी भरले असताना, त्यांना एकूण ₹१.८३ लाख कोटी रुपयांची दाव्याची रक्कम देण्यात आली आहे. हे प्रमाण शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियमपेक्षा सरासरी ५ पट जास्त आहे.

I’m Akshay Sakrate, a blogger with 3+ years of experience covering government schemes, women empowerment, and rural development. I aim to provide clear and reliable information to help people access the benefits they deserve. I simplify complex schemes into easy-to-follow guides, making government services more accessible to all.