Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा जून हप्ता जमा होतोय आजपासून! पात्र महिलांनी लगेच खातं तपासा

Ladki Bahin Yojana राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” अंतर्गत जून महिन्याचा हप्ता आजपासून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने अधिकृतरित्या याबाबत माहिती दिली असून, ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत व बँक खाते आधारशी जोडले आहे, अशा महिलांच्या खात्यात ₹1500 इतकी रक्कम जमा केली जात आहे.

पात्र महिलांना मिळणार ₹1500

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला ₹1500 रक्कम जमा केली जाते. जून 2025 महिन्याचा हप्ता आजपासून वितरित केला जात असून, अनेक महिलांच्या खात्यात आधीच रक्कम जमा झाल्याची पुष्टी झाली आहे.

5 जुलै 2025 अपडेट:
लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता आजपासून पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने ही अधिकृत माहिती दिली असून, ज्या लाभार्थ्यांचे खाते आधारशी जोडलेले आहे आणि अर्ज मंजूर आहे, त्यांना ₹1500 हप्ता मिळणार आहे. खात्याची स्थिती आणि पैसे आलेत की नाही, हे लगेच तपासा.

तुमचं नाव यादीत आहे का? लगेच तपासा

ज्या महिलांनी अर्ज केला आहे आणि त्यांची पात्रता निश्चित झाली आहे, त्यांनी आपले बँक खाते किंवा DBT (Direct Benefit Transfer) पोर्टलवर जाऊन स्थिती तपासावी. जर तुमचं खाते आधार कार्डशी लिंक नसेल, तर पैसे अडकू शकतात.

हप्ता मिळण्यासाठी आवश्यक अटी:

  • अर्जदार महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी
  • वय 21 ते 60 वर्ष दरम्यान असावे
  • आधार आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक
  • अर्ज मंजूर झालेला असावा

हप्ता न मिळाल्यास काय कराल?

जर तुमच्या खात्यात अजून रक्कम जमा झाली नसेल, तर संबंधित CSC केंद्र, तलाठी, ग्रामसेवक किंवा महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधा. तसेच DBT पोर्टलवरून तुमचा पैसे ट्रान्सफर स्टेटस तपासता येतो.

 एकूणच, लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी तुमचं खातं आणि आधार लिंक आहे का, हे लगेच तपासा आणि सरकारी लाभाचा फायदा घ्या!

लाडकी बहीण योजनेतील अपात्रता नियम

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना महिलांनी खालील अटी लक्षात घ्याव्यात. या अटींपैकी कोणतीही एक जरी लागू झाली, तरी संबंधित महिला योजनेसाठी अपात्र ठरते:

  1. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असेल.
  2. कुटुंबातील कोणीतरी इनकम टॅक्स भरत असेल.
  3. कुटुंबात सरकारी नोकरी करणारा / पेन्शनधारक / महामंडळ, निगम कर्मचारी असेल (कंत्राटी व स्वयंसेवी वगळता).
  4. लाभार्थी महिला आधीच इतर सरकारी योजनेंतर्गत दरमहा ₹1500 पेक्षा जास्त लाभ घेत असेल.
  5. कुटुंबात सध्याचे किंवा माजी खासदार / आमदार असतील.
  6. कुटुंबातील सदस्य बोर्ड, संचालक इ. पदावर कार्यरत असेल.
  7. कुटुंबाच्या नावावर ५ एकरांपेक्षा जास्त शेती जमीन असेल.
  8. कुटुंबात चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) नोंदणीकृत असेल.
Related